क्रेडिट कार्ड वापर करत असताना या ०७ प्रमुख क्रेडिट कार्ड चुका टाळा नाहीतर तुम्हाला होऊ शकते मोठे नुकसान …

क्रेडिट कार्ड वापर करत असताना या ०७ प्रमुख क्रेडिट कार्ड चुका टाळा नाहीतर तुम्हाला होऊ शकते मोठे नुकसान …

क्रेडिट कार्ड म्हणजे नेमक काय? (what is credit card)

क्रेडिट कार्ड हे एक पेमेंट कार्ड असून, बँका आणि काही मोठ्या NBFC आणि फायनॅन्स  कंपन्या आपल्या वापर कर्त्याना एखादी वस्तू किंवा सेवा खरेदी करण्यासाठी क्रेडिट कार्डवर रोख काढण्याची आणि विविध ऑनलाईन प्लॉटफोम वर पैसे वापरण्याची मुभा देते.
थोडकयात सांगायचा झाला तर, जर आपल्याकडे पैसे नसले तरी आपण खरेदी करू शकतो आणि त्यानंतट आपल्याला एका ठराविक वेळेनानंतर त्या वस्तूचे क्रेडिट कार्ड बिल आपलाला भरावे लागते. म्हणजेच जवळपास आपल्याला 30 ते 40 दिवसाचा एक इंटरेस्ट फ्री  कालावधी मिळतो.

सध्याच्या वेळी भारतात क्रेडिट कार्ड चे किती यूजर आहे?

सध्याच्या वेळी डिजिटल पेमेंट मुळे, क्रेडिट कार्ड चा वापर चांगलाच वाढला आहे. तसेच विविध ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर काही बँका आपला यूजरला क्रेडिट कार्ड वापरल्यास काही सुट् , आणि रिवॉर्ड पॉइंट देते. त्यामुळे पण क्रेडीट कार्ड के यूजर वर्षानु वर्ष वाढत चाल्ले आहे.

सध्याच्या वेळी, April २०२३ मध्ये ८.६ कोटी (८.६ million)User आहे.तर हाच डाटा April २०२२ मध्ये 7.5 कोटी होता.म्हणेजच जवळपास 15% ग्रोथ झाली आहे.तसेच काही अनुमान नुसार, क्रेडिट कार्ड यूजर हे २०२४ पर्यंत १०कोटी होऊ शकता.

ऑक्टोबर २०२२ पर्यंत, भारतात क्रेडिट कार्ड कंपनी मध्ये HDFC बँकेचा सर्वात जास्त मार्केट शेअर २१% आहे.  तर त्याची ग्रोथ ९ टक्केने वाढ नोंदवली गेली आहे. त्यानंतर SBI कार्ड चा मार्केट शेअर १९% आणि ICICI बँकेचा १७% मार्केट शेअर होता.

खालील दिलेला प्रमुख 07 गोष्टी क्रेडीट कार्ड वापरताना लक्षात ठेवा.

1. क्रेडिट कार्ड चे बिल पूर्ण न भरता फक्त ‘मिनिमम ड्यू’ भरणे.

  • क्रेडिट कार्ड चे बिल आल्यावर आपल्याला बिल भरण्यासाठी किमान देयक ‘minimum Due’ च्या पर्याय असतो. आणि पूर्ण देयक म्हणेच Total outstanding चा पर्याय असतो.अशाप्रकारे आपल्लाला दोन ऑप्शन आसत. क्रेडिट कार्ड कंपन्या जाणूनबुजून मिनिमम ड्यू च्या ऑप्शन आधी देते. जेणेकरून यूजर ने पहिले मिनिमम ड्यू च्या ऑप्शन वापरावा.
  • जर तुम्ही मिनिमम पेमेंट केले तर, तुम्हाला ५० दिवसाचा व्याजमुक्त कालावधीचा फायदा, घेता येत नाही. किमान देयक दिल्याने पुढे कार्ड चालू राहते, पण उरलेल्या बिलच्या रक्कम वर अतिरिक्त २ ते ४ % व्याज आकारण्यात जाते. वर्षा शेवटी हा व्याजदर २४ ते ४८% जवळपर्यंत जाते.तुमच्या क्रेडीट कार्ड वर तुम्ही जर मागच्या पेमेंट च फक्त मिनिमम ड्यू च्या पर्याच ने पेमेंट केले असेल तर पुढच्या खरेदी करताना इंटरेस्ट फ्री कालावधी मिळत नाही.
  • म्हणून शक्कतो, मिनिमम पेमेंट च्या फंदात पडचा नाही, क्रेडिट कार्ड चा बिल पूर्ण भराचा त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला राहतो.

2.क्रेडीट कार्ड वरून कॅश रक्कम काढणे.

  •  क्रेडीट कार्ड मध्ये कॅश काढण्याचा सुध्दा पर्याय असतो, ज्याप्रमाणे आपण डेबिट कार्डचा वापर करताना कॅश काढतो, तसेच क्रेडिट कार्डव्दारे आपण कॅश काढू शकतो पण तुम्ही जर एक स्मार्ट यूजर असाल तर तुम्ही कॅश काढल्याला अवॉइड करशाल.
  • जेव्हा पण कोणी व्यक्ती क्रेडीट कार्ड चा वापर करून पैसे काढण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा त्याला जवळपास २.५ ते ३ टक्कापर्यंत कॅश अॅडव्हान्स की जमा करावी लागते.
  • अॅडव्हान्स फी शुल्क कमीत कमी २५० रुपयापासून ते ५०० रूप‌यापर्यंत भरावी लागते. हे व्याज तो पर्यंत  लागू राहते जो पर्यंत तुम्ही पेमेंट पूर्ण करत नाही.क्रेडिट कार्ड वरून पैसे काढणाचा मुख्य तोटा म्हणेज, यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर घसरतो.

3.क्रेडीट कार्ड चे बिल वेळेवर न भरणे.

  • जर आपण क्रेडीट कार्ड वरून, एखादी वस्तु किंवा सेवा विकत घेतो. तेव्हा आपल्याला जवळपास बिल भरण्यासाठी ४० ते ४५ दिवसाची मुदत मिळेत. ती कंपनी आपल्याला एसएमएस किंवा मेल द्वारे कळवते.
  • क्रेडीट कार्डचे बिल तुम्ही जर वेळच्या आत भरले नाही तर जवळपास हा व्याजदर १४% ते ४०% च्या दरम्यान लागतो. त्यामुळे तुमच्या पुढच्या खरेदीवर इंटरेस्ट फ्री क्रेडीट मिळत सुध्दा नाही.आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणज क्रेडीट स्कोअर खूप घसरतो त्यामुळे भविष्यात कुठल्याही कर्ज व सोयीचा लाभ घेण्यास अडचण होते.

4.क्रेडिट मर्यादपेक्षा जास्त खर्च करणे.

  • प्रत्येक क्रेडीट कार्ड ला एक मर्यादा असते. क्रेडीट कार्ड चे भरपूर फायदे जरी असेल, तर आपण खर्च किती करायचा याचा जाणी-पूर्वक विचार करायचा. प्रत्येक कार्ड च्या एका मर्यादा पर्यंत आपण खर्च शकतो.
  • म्हणेजच क्रेडीट कार्ड च्या एकूण मर्यादा पैकी 30% टक्यापर्यंत चा वापर करणे हा योग्य असतो.यालाच आपण क्रेडीट यूटिलायजेशन रेशओ (credit utilization ratio) म्हणतो.
  • जर आपण 30% पर्यंत आपण क्रेडीट कार्ड व्यवस्थित रित्या वापरला तर आपला क्रेडीट स्कोअर देखील चांगला वाढू शकतो. CIBIL स्कोअर सुधारण्यासाठी कधीकधी यूजर जास्त खर्च करतात. जर क्रेडिट कार्ड चा वापर  30% पेक्षा जास्त असला तर क्रेडिट कार्ड कंपनी त्यावर  लक्ष ठेवते. आणि त्यामुळे CIBIL स्कोअर देखील कमी करू शकतात. CIBIL स्कोअर हा जवळपास ७५०+ चा वर असला पाहिजे.

5.एकापेक्षा अधिक क्रेडीट कार्ड असणे.

  • जर आपण एकापेक्षा अधिक क्रेडीट कार्ड वापरत असलो तर हे धोकादायक ठरूव शकते. जर आपल्याकडे, एकापेक्षा जास्त कार्ड असल्यामुळे क्रेडीट लिमिट वाढते त्यामुळे आपल्या न कळत खूप खर्च होतो.अशावेळी जर क्रेडीट कार्ड चे बिल आपण वेळेवर नाही भरल तर नुकसान घेऊ शकते.

6.क्रेडीट कार्डच्या सुरक्षचा निष्काळजीपणा करणे.

  • डेबिट कार्ड प्रमाणे क्रेडिट कार्ड ही सुरक्षित ठेवणे महत्वाचे आहे. आपल्या कार्डचा गैरवापर होऊ नये म्हणून कार्डची महिती आपली पासवर्ड याबाबत गुप्तता ठवणे. क्रेडीट कार्ड चा सीव्हीव्ही कोड(कार्ड वेरिफिकेशन व्हॅल्यू) नंबर कुणालाही सांगाचा नाही.

7.क्रेडीट कार्ड च्या रिवार्ड पांईटला चेस करणे.

  • बऱ्याच वेळी आपण ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म वर खरेदी केल्यावर आपल्याला रिवार्ड पाईट
  • किंवा कॅशबैक मिळते.त्यामुळे आपल्याला जी- गोष्ट गरजेची नाही, ती गोष्ट सुद्धा आपण घेण्याचा प्रयत्न करतो.
  • कारण की आपल्या डोक्यात FOMO तयार होता कि आपण जर ती एखादी वस्तु घेतली नाही की, आपले ते कूपन वापा जाईल किंवा रिवार्ड पॉइंट वापरल्या जाणार नाही.डिस्कोउंट च्या नादात बराच गोष्टी आपल्याला हयाच्या नसत्या तरी आपण होतो. तर यामुळे आपण रिवॉर्ड पॉइंट ला चेस नाही करायला पाहिजे.
क्रेडिट कार्ड वापर करणे खरंच वाईट आहे का ?

क्रेडिट कार्ड आर्थिक साधने आहेत; त्यांचे मूल्य ते कसे वापरले जाते यावर पूर्णपणे अवलंबून असते. जबाबदारीने वापरल्यास, क्रेडिट कार्डचे अनेक फायदे आहेत जसे की सुविधा, फसवणुकीपासून सुरक्षितता आणि बोनस पुरस्कार. बेजबाबदारपणे वापरल्यास, क्रेडिट कार्डचे कर्ज एखाद्या व्यक्तीच्या जीवनात प्रचंड आर्थिक भार टाकू शकते.

चांगला CIBIL स्कोर हा किती असला पाहिजे?

जेव्हा क्रेडिट कार्ड तुमच्या जीवनात कोणताही आर्थिक ताण वाढवत नाही तेव्हा क्रेडिट कार्ड रिवॉर्ड्स हे स्वागतार्ह बोनस आहेत. तथापि, क्रेडिट कार्ड वापरल्याने तुम्हाला आणखी कर्ज मिळत असेल तर बक्षिसे फायदेशीर नाहीत.

मी मेडिकल बिलांसाठी क्रेडिट कार्ड वापरावे का?
ते अवलंबून आहे. जर तुम्हाला माहित असेल की तुम्ही महिन्याच्या शेवटी तुमची वैद्यकीय बिले भरू शकता, तर क्रेडिट कार्ड हा पेमेंटसाठी चांगला पर्याय आहे. तथापि, जर तुम्ही ते वेळेवर परत करण्यास सक्षम नसाल, तर मोठ्या वैद्यकीय बिलावरील व्याज तुम्हाला त्वरीत दडपून टाकू शकते. पेमेंट योजना तयार करणे किंवा वैद्यकीय प्रदात्याशी इतर वाटाघाटी करणे ही चांगली कल्पना आहे.
चांगला CIBIL स्कोर हा किती असला पाहिजे?
एक चांगला CIBIL स्कोर हा ७५०+ वर मानला जातो. चांगला क्रेडिट स्कोर असलामुळे तुम्हाला लगेच तुमचे लोन पास होते. जर स्कोर हा ३०० ते ५७९ च्या दरम्यान असला तर तो वाईट स्कोर मानला जातो त्यामुळे लोन काढन्यासाठी खूप अडचणी निर्माण होऊ शकतो .

 

Leave a comment

Important Rules When Investing T+0 settlement to begin by March 28 on optional Basic : Says Sebi Chairman What is Meant By Bonus Share? Gopal Snacks IPO Review Tata motors Demerger News